Amol Mitkari On Har Har Mahadev : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच या सिनेमातील संवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरींनी आक्षेप घेतला आहे. मिटकरींनी ट्वीट करत आपला आक्षेप नोंदवला आहे.


अमोल मिटकरींनी ट्वीट केलं आहे," व्हीएफएक्स (VFX) तंत्रज्ञानाचा अतिवापर 'हर हर महादेव' या चित्रपटात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली 'छ. शिवरायांची' भूमिका (अभिनय छान असला तरीही) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. श्री राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते".




"अफजल खानाचा कोथळा काढताना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव वा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभु यांची शब्दफेक व जेधे-बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही".




'हर हर महादेव' हा सिनेमा मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड अशा पाच भाषेत प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा सिनेमा चित्रीत करण्यात आला आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 'हर हर महादेव' या सिनेमात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


'हर हर महादेव' सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?


'हर हर महादेव' हा सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरे म्हणाले होते,"हर हर महादेव' या सिनेमाच्या निर्मितीसाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. अनेक वर्षांनी चांगले डायलॉग असणारा सिनेमा पाहण्यात आला. सिनेमा पाहताना मी भावूक झालो होते. या सिनेमातील काही प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. प्रत्येक मराठी माणसाने हा सिनेमा पाहायला हवा". 


संबंधित बातमी :


Raj Thackeray on Har Har Mahadev : हर हर महादेव चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...