Kota Factory : जितेंद्र कुमारची (Jitendra Kumar) 'कोटा फॅक्ट्री' (Kota Factory) ही प्रचंड लोकप्रिय वेबसीरिज आहे. या सीरिजचे दोन सीझन सुपरहिट झाले आहेत. चाहते आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. या वेब सीरिजमध्ये कोटामध्ये आलेल्या आयआयटी-जेईई आणि एनईईटी या परिक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये युट्यूबवर आला. त्यानंतर या सीरिजला मिळत असलेली लोकप्रियता लक्षात घेत नेटफ्लिक्सने या सीरिजचा दुसरा सीझन रिलीज केला. आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. जाणून घ्या कोटा फॅक्ट्रीचा तिसरा सीझन कधी आणि कुठे पाहता येईल? 


'कोटा फॅक्ट्री' ओटीटीवर कधी आणि कुठे पाहाल? 


फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील सामन्याच्या झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं होतं,"अपनी पेंसिलें तेज कर लें, और सारे फॉर्मूले याद रखें-जीतू भैया और उनके छात्र अब तक की सबसे बडी चुनौती के लिए तैयार हो रहे हैं". या बहुप्रतीक्षित रिलीजची रिलीज डेट आता समोर आली आहे. ईटाइम्सच्या एका वृत्तानुसार, कोटा फॅक्ट्री सीझन 3 जून महिन्यात रिलीज होऊ शकतो. अद्याप नेटफ्लिक्सने तारीख जाहीर केलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्या 'कोटा फॅक्ट्री' ओटीटीवर रिलीज होईल". 






'कोटा फॅक्ट्री' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा राघव सुब्बूने सांभाळली आहे. अरुणाभ कुमार यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. कोटा, राजस्थान येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मध्ये स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांवर आधारित ही सीरिज आहे.


'कोटा फॅक्ट्री'ची स्टार कास्ट


'कोटा फॅक्ट्री' या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार आणि अहसास चन्नासह आलन खान, मयूर मोरे, रंजन राज सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच या सीझनमध्ये तिलोत्मा शोमदेखील झळकणार असल्याचं समोर आलं आहे. 'कोटा फॅक्ट्री'सह जितेंद्र 'पंचायत 3'मध्ये दिसणार आहे. 'पंचायत 3' 31 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.