Kota Fatory Season 2 Streaming: भारतातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वेब सीरीजमध्ये कोटा फॅक्टरीचा समावेश आहे.कोटा फॅक्टरीचा सीझन 2 कधी येणार याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागली होती.  आज या  वेब सीरीजचा दुसरा 
सीझन प्रदर्शित झाला आहे. पहिला सीझन संपल्यानंतर प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न येणाऱ्या दुसऱ्या सीझनमध्ये केला आहे. तसेच पहिल्या सीझनची कथादेखील पुढे ढकलली आहे. 


कोचिंग हबमधील विद्यार्थ्यांवरील दबावाची आणि त्यांना करावा लागणाऱ्या संघर्षाची कथा चांगल्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सीझन 2 (Kota Factory Season 2) मध्ये वैभवला महेश्वरी कोचिंग क्लासमध्ये कसा संघर्ष करावालागला हे दाखवलं जाणार आहे. टीवीफच्या कोटा फॅक्टरीचा पहिला सीझन 2019 मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झाला होता. पहिल्या सीझननंतर प्रेक्षक दुसऱ्या सीझनची वाट बघत होते. आज प्रदर्शित झालेला दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 


येथे पाहू शकता कोटा फॅक्टरीचा सीझन 2 चा ट्रेलर:


 


 


कोटा फॅक्टरीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. त्यामुळे जितेंद्र कुमार एका रात्रीच लोकप्रिय झाला होता. पहिल्या सीझननंतर दुसऱ्या सीझनमध्ये काय कथा असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले
आहे की, कोचिंग हबमधील विद्यार्थ्यांचे लाडके फिजिक्सचे सर जीतू भाई यांनी ते कोचिंग सेंटर सोडले आहे. 


कोटा फॅक्टरीचे दिग्दर्शक राघव सुब्बू यांनी सांगितले की, एक दिग्दर्शक म्हणून मी नेहमीच प्रेक्षकांना भावतील आणि विचार करायलाभाग पडतील अशाच कथा निवडण्याचा प्रयत्न करतो. कोटा फॅक्टरीचा सीझन 2 प्रेक्षकांना गुंतवून ठेवत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न 
करतो. 


या सीरीजमध्ये जितेंद्र कुमार, मयूर मोरे, रंजन राज, आलम खान, अहसास चन्ना, रेवती पिल्लई आणि उर्वी सिंग हे प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. कोटा फॅक्टरी ही भारतातील पहिली ब्लॅक अॅंड व्हाइट वेब सीरीज आहे.