Koffee With Karan 8: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहरचा (Karan Johar)   कॉफी विथ करण-8 (Koffee With Karan 8)  हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कार्यक्रमाचा सध्या आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता कॉफी विथ करण-8 या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल हे उपस्थिती लावणार आहेत. नुकताच कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये राणी आणि काजोल या करणच्या विविध प्रश्नांना मजेशीर उत्तरं देताना दिसत आहेत. 


राणी करणला म्हणाली, मला तुला एक्सपोज करायचंय


कॉफी विथ करण-8 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  करण हा राणी आणि काजोलचं शोमध्ये स्वागत करतो, तो म्हणतो, "माझ्या पहिल्या लिडिंग लेडिजचं मी स्वागत करतो." त्यानंतर  राणी करणला म्हणते, "मला तुला एक्सपोज करायचंय." त्यानंतर काजोल म्हणते, मला आतापासूनच हा शो आवडायला लागला आहे." पुढे राणी करणला म्हणते,  "तू माझ्या हातून अन्न हिसकावून घेतलंस, मला मारलंस." तेव्हा करण म्हणतो, "मी तुला मारलं नाही,"


प्रोमोमध्ये पुढे दिसते की, राणी आणि काजोल या करणनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बझर वाजवून देत आहेत.


पाहा प्रोमो






'कुछ कुछ होता है' ला 25 वर्ष पूर्ण


1998 मध्ये राणी, काजोल आणि शाहरुख यांचा कुछ कुछ होता है हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला रिलीज होऊन 25 वर्षे झाली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं होतं. तसेच या चित्रपटात सलमान खान, अर्चना पूरण सिंग, अनुपम खेर आणि जॉनी लीव्हर यांनी देखील काम केलं होतं.


कॉफी विथ करण-8 मध्ये 'या' कलकारांनी लावली हजेरी


कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.  आता कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये राणी आणि काजोल या कोणकोणते किस्से सांगणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या:


Koffee With Karan 8: वरुण म्हणतो, "करण जोहर घर तोडे" तर सिद्धार्थनं सांगितला मजेशीर किस्सा; 'कॉफी विथ करण' चा नवा प्रोमो आऊट