Koffee With Karan 8 : करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा लोकप्रिय टॉक शो आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. आता 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात करण जोहरने (Karan Johar) अर्जुन कपूरला '(Arjun Kapoor) मलायका अरोरासोबतच्या (Malaika Arora) नात्याबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यामुळे अर्जुन हे अनफेअर असल्याचं म्हणाला आहे. 


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लग्नबंधनात कधी अडकणार? (Malaika Arora Arjun Kapoor Wedding Plan)


करण जोहरने अर्जुनला विचारलं मलायकासोबतचं तुझं नातं पुढे घेऊन जाण्याचा काही विचार करतो आहेस का? यावर उत्तर देत अर्जुन म्हणाला,"आयुष्याच्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलण्याचा हा योग्य मंच नाही. निर्णय होईल तेव्हा आम्ही दोघेही यासंदर्भात तुम्हाला माहिती देऊ. सध्या मी खूप आनंदात आहे. आमच्या नात्याबद्दल मी एकटं काही बोलू शकत नाही. मला वाटतं रिलेशनबद्दल एकट्याने भाष्य करणं हे त्या नात्यासाठी चुकीचं आहे".






अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा होती. पण मलायकाच्या वाढदिवसाला तिच्यासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत त्याने या सर्वांना पूर्णविराम दिला. 


अर्जुन कपूर करतो ट्रोलिंगकडे दुर्लक्ष


अर्जुन कपूरपेक्षा मलायका अरोरा 9 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोल केलं जातं. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"ट्रोलिंगचा फरक पडत नाही असा कोणताही व्यक्ती या जगात नाही. तुम्हाला या गोष्टींचा सामना करावाच लागतो. ट्रोल करणाऱ्यांना आधी मी उत्तर देत होतो. पण नंतर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो". 


फ्लॉप सिनेमांबद्दल अर्जुन म्हणाला...


करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात अर्जुन कपूरच्या सलग फ्लॉप होणाऱ्या त्याच्या सिनेमांबद्दल भाष्य केलं आहे. अर्जुन म्हणाला,"करिअरच्या सुरुवातीला सुपरहिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत माझा समावेश होतो. एकीकडे ही यश अनुभवलं आहे आणि आता माझे सिनेमे फ्लॉप होत आहेत. सिनेमे हिट किंवा फ्लॉप होणं हा प्रत्येक कलाकाराचा भाग आहे. कोणी जाणूनबुजून फ्लॉप सिनेमे बनवत नाही. पण शेवटच्या श्वासापर्यंत मी अभिनय करत राहणार".


संबंधित बातम्या


Karan Johar : करण जोहरने केला लग्न न करण्याचा खुलासा; म्हणाला,"माझ्या आयुष्यात 'ते' नव्हतं"