Karan Johar : करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माता आहे. तो अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमामुळे करण चर्चेत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्याने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.


करण जोहरला नुकत्याच एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की,"तुझ्या सिनेमात लग्नाचे अनेक सीक्वेंस असतात. पण खऱ्या आयुष्यात तुझा लग्न, संसार या सर्व गोष्टींवर किती विश्वास आहे?". याचं उत्तर देत करण म्हणाला,"तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा...नसेल करायचं तर नका करू. माझ्या आयुष्यात लग्न ही गोष्ट नव्हती. त्यामुळे मी नाही केलं. लग्न न करण्याचा निर्णय माझा वैयक्तिक आहे. पण लग्नावर माझा विश्वास आहे का? तर याबद्दल माझ्याकडे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत".


करण जोहर पुढे म्हणाला,"लग्न करण्याचा निर्णय हा तुमचा वैयक्तिक आहे. कुटुंब असो वा समाज.. लग्न करण्यासाठी आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमच्यावर कोणी दबाव टाकत असेल, तर वेळीच या गोष्टीवर आवर घाला. प्रेम, लग्न, करिअर या माझ्या वैयक्तिक गोष्टी असून त्यांचे निर्णय मी स्वत: घेतो". 


करण जोहरचा 'योद्धा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Karan Johar Upcoming Movie)


करण जोहरचा आगामी 'योद्धा' (Yodha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. करणचा हा बिग बजेट सिनेमा असून यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. हा अॅक्शन सिनेमा असून यात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पाटनी आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


करण जोहरबद्दल जाणून घ्या... (Who is Karan Johar)


करण जोहर हा बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माता आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा करण जोहरने सांभाळली आहे. त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कल होना हो, कभी अलविदा ना कहना, दोस्ताना, डियर जिंदगी, अशा अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा करण जोहरने सांभळली आहे. 


संबंधित बातम्या


Koffee with Karan 8: "करण आम्ही इथे 'शुद्धी' करण्यासाठी आलोय"; कॉफी विथ करणमध्ये विकीचं वक्तव्य, तर कियारानं सांगितले 'हे' सिक्रेट्स