Kili Paul : सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे रील्स व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून  'एका वाघाची शिकार एका हरणीने केली' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावरील डान्सचे रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.आता या मराठी गाण्याची  टांझानियाच्या किली पॉलला (Kili Paul) देखील भूरळ पडली आहे. किली पॉलनं नुकताच या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


'एका वाघाची शिकार एका हरणीने केली' या गाण्यावरील व्हिडीओ किली पॉलनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची बहीण  नीमा पॉल  देखील दिसत आहे. किली आणि नीमा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किलीनं या व्हिडीओला 'A Masterpiece Song'असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये किली हा फेटा, सदरा अशा लूकमध्ये दिसत आहे तर नीमा ही घागरा आणि गोल्डन ज्वोलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


किलीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन त्याचं कौतुक केलं आहे, एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'भावा जिंकलस अख्या महाराष्ट्राला' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खूप खूप छान दिसतायत तुम्हीं दोघे.. '


पाहा व्हिडीओ: 






किली (Kili Paul) आणि नीमा यांनी 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ देखील काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 5.1 मिलियन  नेटकरी किली पॉलला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. त्याच्या रिल्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. किलीची बहीण नीमा देखील सोशल मीडियावर विविध डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. नीमाला इन्स्टाग्रामवर  619K एवढे फॉलोवर्स आहेत. किली आणि नीमा यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. अनेक नेटकरी त्यांच्या व्हिडीओला लाइक आणि कमेंट्स करत असतातत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Viral Video : किली पॉलचा मराठमोळा अंदाज, बहिणीसोबत थिरकला 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर; नेटकरी म्हणाले, 'भाऊ मराठी प्रेक्षकांना...'