दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या (Yash) केजीएफ चॅप्टर 1 ने (KGF Chapter 1) बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. त्यामुळेचं आता प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाट्या दुसर्‍या भागाची वाट पाहत आहेत. अखेरीस केजीएफ चॅप्टर 2 ची रिलीझ डेट समोर आली आहे. वर्षाच्या मध्यभागी अभिनेता यश केजीएफ चॅप्टर 2 रुपेरी पडद्यावर मोठा धमाका करणार आहे.

Continues below advertisement


या दिवशी होणार चित्रपट रिलीज
केजीएफ चॅप्टर 2 यावर्षी 16 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्षित होईल. या चित्रपटाची चाहते अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट सुपरहिट मानला जात आहे. कारण, त्याचा पहिला भागही जबरदस्त हिट झाला होता. अभिनेता यशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. यात त्याने चित्रपटातील आपल्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली असल्याने तयार राहा.


यशने ही पोस्ट करताच अनेक कमेंट आणि लाईक्स त्यावर येऊ लागल्या असून ही पोस्ट व्हायरल होत आहे.




रॉकीच्या भूमिकेत पुन्हा करणार धमाका

केजीएफ चित्रपटात अभिनेता यशने रॉकीची भूमिका साकारली आहे. तो या चित्रपटात माफियाच्या भूमिकेत दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्याची कहाणी इतकी जबरदस्त होती की त्यानंतर लोक त्याच्या दुसर्‍या भागाची वाट पहात आहेत. आता त्याची रिलीज डेटही समोर आली आहे. ही यशच्या चाहत्यांसाठी खरोखर चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसुद्धा याच्या दुसऱ्या भागात आहे, तिची भूमिका खूप जबरदस्त मानली जात आहे. अलीकडेच रवीना टंडनने या संदर्भात ट्विट केले होते. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.