Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. केतकी ही सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. नुकतीच केतकीनं तिच्या इन्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली. यामध्ये केतकीनं ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याच्या स्क्रिनशॉर्ट शेअर करुन त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


केतकीची पोस्ट
एका नेटकऱ्यानं 'मानसिक रोगी' अशी कमेंट करुन केतकीला ट्रोल केले. नेटकऱ्यानं केलेल्या या कमेंटला केतकीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. केतकीनं त्या युझरच्या कमेंटला रिप्लाय करत लिहिलं. 'मला ट्रोल करायला नवीन मटेरिअल तरी आणा रे बाजारात. ओह सॉरी मी विसरलेच की तुमचा तेवढा बुद्धांकच नाही ते! चालू द्या तुमचं सात वर्ष जुनं गाऱ्हाणं' केतकीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. 



केतकीच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. तिला इन्टाग्रामवर 65 हजार नेटकरी फॉलो करतात. केतकीनं काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर प्रकरणावर देखील पोस्ट केली होती. तिच्या  'सनातनी मुलांनो तुम्हाला ही सुधरावं लागेल. तुम्ही जोपर्यंत तुमच्या पोकळ पुरुषार्थावर प्रेम करत राहाल तोपर्यंत मुली अब्दुल, अफताब, एहमद यांच्यासोबत दिसतील. कारण ही मुलं मुलींना पटवण्यासाठी त्यांना अटेंशन देतात त्यानंतर त्या मुलीला ते मारतात.'  असं त्या पोस्टमध्ये केतकीनं लिहिलं होतं. तसेच केतकी ही ‘एपिलेप्सी’ (Epilepsy) या विषयाबाबत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते.






'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेमुळे केतकीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच केतकीच्या अंबट गोड या मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. केतकी ही ‘एपिलेप्सी’ (Epilepsy) या विषयाबाबत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. काही नेटकरी केतकीच्या सोशल मीडियावरील पोस्टचं कौतुक करतात. तर काही युझर्स तिला ट्रोल करतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ketaki Chitale: 'सनातनी मुलांनो, तुम्हाला सुधरावं लागेल'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणाबद्दल केतकी चितळेची पोस्ट