मुंबई : अमेरिकन मॉडेल केंडल जेनरने मॉडेलिंगच्या विश्वात खळबळ माजवली आहे. अवघ्या 22 वर्षीय केंडलने केट मॉस, मिरांड केर आणि नाउमी काम्पबेल यांसारख्या मॉडेलना कमाईच्या यादीत मागे टाकलं आहे. केंडलची वार्षिक कमाई सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.


2017 या एका वर्षात केंडल सर्वात जास्त कमाई करणारी मॉडेल ठरली आहे. केंडलने एका वर्षात तब्बल 2.2 कोटी डॉलर म्हणजे 140 कोटी रुपये कमावले. केंडलने ब्राझिलची मॉडेल जिजल बिंदचिनला कमाईत मागे टाकलं आहे. जिजल 2002 पासून मॉडेलिंग क्षेत्रातील कमाईत पहिल्या स्थानावर होती.

केंडल ही अमेरिकन टीव्ही सेलिब्रेटी किम करदाशियाची सावत्र बहीण आहे. केंडलचे इन्स्टाग्रामवर 8.4 कोटी फॉलोअर्स आहेत.

2015 मध्ये फोर्ब्स मॅगझिनने सर्वात कमाई करणाऱ्या मॉडेलची यादी जाहीर केली. यामध्ये केंडल 16 व्या स्थानावर होती, तेव्हा ती अवघ्या 20 वर्षांची होती.

एप्रिल महिन्यातच केंडल त्या 15 सेलिब्रिटीजमध्ये समाविष्ट झाली, ज्यांचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.