KBC 14 : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांच्या ज्ञानातदेखील भर घातलो. त्यामुळेच या कार्यक्रमाची प्रेक्षकांना उत्सुकता असते. 'कौन बनेगा करोडपती 14' या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात आमिर खान (Aamir Khan) सहभागी होणार आहे. तसेच हॉट सीटवरबसून प्रश्नांचे  उत्तर देताना दिसणार आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आमिर या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर उपस्थित राहणार आहे. 






'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाच्या माध्यमातून आमिर खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. या सिनेमात आमिर सोबत करीना कपूरदेखील दिसणार आहे. अद्वैत चंदनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


कौन बनेगा करोडपती 14' चा नवा नियम


'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळत असतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. 8 ऑगस्टपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; 'असा' असेल बदललेला नियम


Kaun Banega Crorepati 14 : 'केबीसी'च्या नव्या पर्वात सहभागी व्हायचंय? असं करा रजिस्ट्रेशन...