Amitabh Bachchan Learns Tula Words in KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 15) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत ज्ञानात भर करण्याचं कामही हा कार्यक्रम करत आहे. आता 'केबीसी 15' (KBC 15) मंचावर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांची लाडकी सून ऐश्वर्या राय बच्चनसाठी (Aishwarya Rai Bachchan) खास काम केलं आहे.
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात विविध विषयांवरील प्रश्न अमिताभ बच्चन स्पर्धकांना विचारत असतात. खेळ खेळण्यासह या मंचाच्या माध्यमातून वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टीदेखील ते शेअर करत असतात. आपल्या कुटुंबियाबद्दलही ते भाष्य करत असतात. आता नुकत्याच पार पडलेल्या केबीसीच्या भागात अमिताभ बच्चन यांनी त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चनचा उल्लेख केला आहे. बिग बींच्या या गोष्टीचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
अमिताभ बच्चन यांनी शिकली 'तुलू' भाषा
'कौन बनेगा करोडपती 15'चा नुकताच पार पडलेला भाग खूपच मजेशीर आहे. या भागाच्या सुरुवातीला बिग बींसमोर प्रतिष्ठा बसलेली दिसत आहे. ती आपल्या वडिलांसोबत या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. खेळ सुरू होण्याआधी प्रतिष्ठाचा तिचे वडील तुलू भाषेत शुभेच्छा देतात. ते लेकीला 'कुद्रे' असं म्हणतात.
'कुद्रे' या तुलुगू शब्दाचा अर्थ 'घोडा' असा आहे. त्यावेळी प्रतिष्ठा अमिताभ बच्चन यांच्यासमोर खुलासा करत म्हणते की,"माझे वडील मला 'कुद्रे' किंवा 'कट्टे' (गाढव) अशी हाक मारतात". प्रतिष्ठाचं हे बोलणं ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांना हसू अनावर होतं. बिग बी प्रतिष्ठाच्या वडिलांचेदेखील आभार मानतात. बिग बॉसच्या माध्यमातून त्यांना तुलूचे दोन शब्द शिकता आले याचा त्यांना आनंद आहे. अमिताभ बच्चन म्हणतात,"माझी सून ऐश्वर्या राय बच्चनदेखील 'तुलू' आहे. आज मीदेखील या भाषेतील दोन शब्द शिकलो".
अमिताभ बच्चन यांचं चाहत्यांकडून कौतुक
अमिताभ बच्चन यांनी 'तुलू' भाषेतील दोन शब्द शिकले आहेत. याबद्दल ते म्हणतात,"प्रतिष्ठाच्या वडिलांचे खूप-खूप आभार..आज त्यांच्यामुळे मला दोन शब्द शिकता आले असून आज घरी जाऊन मी ते बोलणार आहे. माझी सून तुलू भाषा बोलते. तिच्यासोबत मी त्या भाषेत बोलू शकत नाही. पण नक्कीच हे दोन शब्द बोलू शकतो". अमिताभ बच्चन यांच्या या वक्तव्याने चाहतेही भारावले आहेत. बिग बींचं ते कौतुक करत आहेत.
संबंधित बातम्या