मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने सलमानच्या 'भारत' चित्रपटाला रामराम ठोकला. त्यानंतर सलमानची लाडकी अभिनेत्री त्याच्या मदतीला धावून आली आहे. कतरिना कैफ आता ही भूमिका साकारणार आहे.


येत्या सप्टेंबर महिन्यापासून कतरिना 'भारत' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. खुद्द सलमाननेच फेसबुक, ट्विटरवरुन ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


आतापर्यंत मैने प्यार क्यों किया, पार्टनरपासून एक था टायगर आणि टायगर जिंदा है सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सलमान आणि कतरिना यांनी एकत्र काम केलं आहे. दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते कायमच आतुर असतात. त्यामुळे 'भारत' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा ही संधी मिळणार आहे.

निकसोबत लग्नासाठी प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला?

कतरिना आणि सलमानसोबत काम करण्यास मी प्रचंड उत्सुक असल्याच्या भावना दिग्दर्शक अली अब्बास जफरने व्यक्त केल्या आहेत.

लग्नासाठीच प्रियंका चोप्राने अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' चित्रपट सोडल्याचं म्हटलं जातं. दिग्दर्शक अली आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांना प्रियंकाविषयी कुठलीही अढी नाही. मात्र रील लाईफ प्रॉडक्शन्सचे सीईओ निखिल नमित प्रियंकावर नाराज असल्याचं दिसत आहे. अचानक असा निर्णय घेण्याचं प्रियंकाचं वर्तन अत्यंत अनप्रोफेशनल असल्याचं ते म्हणाले.

निक बर्थडेलाच प्रियंकासोबत लगीनगाठ बांधणार?

16 सप्टेंबर रोजी निक 26 वर्षांचा होत आहे. याच मुहूर्तावर प्रियंका आणि निक लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अवघा दीड महिना उरल्यामुळे प्रियंकाच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.

सलमान खानसोबत या चित्रपटात तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही झळकणार आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमधील शूटिंग सुरु झालं.