कतरीनाने फेसबुक लॉग-इन करताच आपल्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
कतरीनाने आपला ३३ वा वाढदिवस आपल्या काही मित्रांसोबत साजरा केला. या वेळी तिच्या कुटुंबियांसोबतच आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य कपूर, कबीर बेदी, रेशमा शेट्टी आणि अली अब्बास जफर उपस्थित होते. या सेलिब्रेशनसाठी तिचा एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरला अमंत्रण नव्हते.
कतरीना तिच्या आगामी चित्रपट बार-बारमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. एबीपी माझाकडून कटरीनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!