घटस्फोटानंतर करिश्मा कपूर बॉयफ्रेण्डसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार!
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2016 09:03 PM (IST)
मुंबई : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर बॉयफ्रेण्डसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचं कळतं, तेही तिच्या दोन्ही मुलांसह. संजय कपूरपासून वेगळं झाल्यानंतर करिश्मा मुंबईतील एका कंपनीचा सीईओ संदीप तोशनीवालसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा आहे. संदीप तोशनीवाल लवकरच पत्नी अश्रिताला घटस्फोट देणार आहे. करिश्मासोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी संदीपला मुंबईत 3 बीएचके फ्लॅट घ्यायचा असून घराचा शोध सुरु आहे. पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर संदीप एकटा राहणार नाही, तर करिश्मा आणि तिच्या समायरा-कियान या दोन्ही मुलांसोबत राहणार आहे. करिश्मा आणि संदीपला त्यांचं नातं अधिक दृढ करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे संदीप मुंबईतील हे महागडं घर करिश्मा कपूरला गिफ्ट म्हणून देणार आहे, असंही म्हटलं जात आहे. पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा दोन्ही मुलांसह तिचे वडील रणधीर कपूर यांच्यासोबत राहत आहे.