नवी दिल्ली : अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्यातील घटस्फोट प्रकरणात आज एक तडजोड झाली. परस्पर संमतीने वेगळं होण्यासाठी दोघेही तयार झाले आहेत. या दोघांमध्ये मुलांच्या ताब्याबाबत मोठा वाद होता. मात्र करारानुसार, दोन्ही मुलांचा ताबा करिश्माकडे असेल. तर संजयला मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.


 

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात का गेलं?

- करिश्मा आणि संजयचं लग्न 14 वर्षांपूर्वी झालं होतं. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि आता घटस्फोटाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

- दोघांनी 2014 मध्ये मुंबईमध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. पण संजय कपूरने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत व्हावी. कारण मुंबईत रवी पुजारी टोळीकडून धमकी मिळत आहे, अशी मागणी केली होती.

 

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बातचीत

- संजय आणि करिश्माने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये जवळजवळ सर्व मुद्द्यांवर तडजोड झाली. समायरा आणि कियानच्या कस्टडीचा मुद्दा शुक्रवारी सकाळी सोडवला.

- मुलं सध्या करिश्मा सोबत राहतात. मुलांना भेटणं आणि ताबा या दोन मुद्द्यावर वाद होता.

- चर्चा करुन हा मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिल्ली हायकोर्टाने आधीच दिला होता.

- करिश्माने 2012 मध्ये संजयचं घर सोडलं होतं. सध्या ती आई-वडिलांसह मुंबईत राहते. तर संजय कपूर दिल्लीत राहतो.

- करिश्मा कपूरने संजय आणि तिच्या सासूविरोधात हुंड्यासाठी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती.

 

2012 पासून करिश्मा-संजय वेगळे

- करिश्माने 29 सप्टेंबर, 2003 रोजी बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. हे करिश्माचं पहिलं आणि संजयचं दुसरी लग्न होतं.

- 2012 मध्ये दोन्ही वेगळे झाले. करिश्मा तिची आई बबिता यांच्यासोबत मुंबईत राहते.

- परस्पर संमतीने दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता.

- नोव्हेंबर 2015 मध्ये दोघांनी मुंबईच्या फॅमिली कोर्टातून घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला.

- घटस्फोटासाठी निश्चित केलेली आर्थिक अट संजय कपूर पूर्ण करु शकला नाही, असं करिश्माने सांगितलं.

- संजयने मुंबईच्या वांद्रे कोर्टात डिसेंबरमध्ये पुन्हा घटस्फोटाता अर्ज दाखल केला होता.

- त्यानंतर रवी पुजारी टोळीकडून धमकी मिळत असल्याच्या तक्रारीनंतर संजयने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.