विराटसोबत सिनेमा बनवण्यास करण जोहर उत्सुक
एबीपी माझा वेब टीम | 30 Oct 2017 11:12 AM (IST)
विराट नुकताच एका जाहिरातीमध्ये गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्मासोबत झळकला होता. ही जाहिरात पाहून करण एवढा प्रभावित झाला की त्याने ट्विटरवर त्याचं कौतुकही केलं.
मुंबई : बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा स्टार किड्सना लॉन्च करण्यासाठी ओळखला जातो. पण टॅलेंट ओळखण्यात तो उशिर करत नाही. पारख करण्यात तो चुकत नाही. आता करण जोहरची नजर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर आहे. विराटच्या अभिनयाने करण फारच प्रभावित झाला आहे. विराटला भेटण्यासाठी सुरक्षा भेदून चाहता मैदानात! विराट नुकताच एका जाहिरातीमध्ये गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्मासोबत झळकला होता. ही जाहिरात पाहून करण एवढा प्रभावित झाला की त्याने ट्विटरवर त्याचं कौतुकही केलं. "अभिषेक वर्मनने या जाहिरातीचं सुंदर दिग्दर्शन केलं आहे आणि विराट उत्तम अभिनेता आहे," असं ट्वीट करणने केलं आहे. https://twitter.com/karanjohar/status/921413759477805056 सूत्रांच्या माहितीनुसार, करण जोहराल त्याच्या सिनेमात विराट कोहलीला घ्यायचं आहे. जर विराट हिरो बनला तर हिरोईन अर्थातच अनुष्का शर्माच असेल. सर्वाधिक वेगवान 9 हजार धावा पूर्ण, विराटचा विश्वविक्रम हे वृत्त खरं ठरलं तर विरानुष्काच्या चाहत्यांसाठी याहून आनंदाची गोष्ट नसेल. दरम्यान, विराट आणि अनुष्का या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचंही वृत्त होतं. डिसेंबरमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली खेळणार नाही, असं म्हटलं जात आहे. लग्नासाठी तो ब्रेक घेत असल्याची चर्चा आहे. संबंधित बातम्या विराटचा लग्नासाठी ब्रेक, डिसेंबरमध्ये अनुष्कासोबत लग्न? ‘मी नेहमी तुझी काळजी घेईन...’, विराटचं अनुष्काला वचन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर