Karan Johar : बॉलीवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर (Karan Johar) हा कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. करण हा वयाच्या 50 व्या वर्षातही सिंगल असून तो सिंगल फादरचीही भूमिका निभावत आहे. पण करणने अजूनही लग्न का केलं नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना कायमच पडत असतो. याच प्रश्नाचं उत्तर करणने दिलं आहे. 


फेय डिसूझला दिलेल्या मुलाखतीमध्ये करणने त्याच्या आयुष्याच्या या टप्प्यावरही सिंगल  राहण्याचं कारण सांगितलं आहे. तसेच तो एकट्याने त्याच्या मुलांचं संगोपन करत असून आता माझ्यावर आई आणि मुलांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. 


करणने काय म्हटलं?


करणने त्याच्या सिंगल स्टेटसवर म्हटलं की, मी आता बरीच वर्ष झालं सिंगल आहे आणि बऱ्याचवर्षांपासून मी कोणत्याही नात्यामध्ये अडकलो नाही. खरंतर मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात फक्त वन अँड हाफ रिलेशनशिपमध्ये होतो आणि तेही माझ्या 30मध्ये.पण आत मी माझं सिंगल स्टेटस ऍन्जॉय करतोय. कारण तुमचं बाथरुम, स्पेस, शेड्युल्ड हे सगळं दूरच राहिलं पण तुम्ही स्वत:तुमच्या दिवसाची ताकद आहात. सध्या माझी जबाबदारी ही माझ्या मुलांसाठी आणि आईसाठी आहे. माझा दिवस त्यांच्यापासून सुरु होतो आणि त्यांच्यासोबतच संपतो. 


तेव्हा जाणवलं की जोडीदार हवा - करण


मी जेव्हा 40 वर्षांचा झालो तेव्हा मला जाणवलं की, आयुष्यात जोडीदार हवा. पण जेव्हा मी पन्नाशी पार केली तेव्हा मात्र आयुष्यात आता कोणी नको असं वाटू लागलं. डेटिंग करण, देशातील, परदेशातील लोकांना भेटणं हे सगळं मी अनुभवलं आहे. त्यामुळे यापुढे माझ्यासाठी मला कुणी योग्य वाटलं तर ठीक नाहीतर मल जोडीदारची अजिबात गरज नाही, अशा स्पष्ट भावना करणने व्यक्त केल्या आहेत.  


माझ्या शरीराबाबत मी अजिबात आनंदी नाही - करण


करणने त्याच्या शरीरविषयी वक्तव्य करताना म्हटलं की,  माझ्या शरीराबद्दल अजिबात आनंदी नाही. ज्याप्रकारे माझं शरीर आहे, मी जसा दिसतो, जसा आहे, त्याबाबत मला कायम अवघडल्यासारखं वाटतं. होय मला माझ्या शरीराबद्दल न्यूनगंड आहे आणि म्हणून मला आत्मविश्वासही मिळत नाही. मी लहान असताना देखील मला असंच वाटायचं. माझ्या शरीराबाबत आत्मविश्वास मिळवण्याचा, तसेच हे जे काही माझे विचार आहेत, ते थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते जमलं नाही. 


ही बातमी वाचा : 


Marathi Movie Yere Yere Paisa 3 : संजय जाधव यांच्या चित्रपटात झळकणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्री; उमेश कामत, तेजस्विनी पंडितचीही भूमिका