Karan Grover And Bipasha Basu :  वडील आणि मुलीचे नातं हे वेगळं असते. वडिलांचे मुलीवर सर्वाधिक प्रेम असते. मुलगी  आजारी असली की सर्वाधिक काळजी वडिलांना असते.  अभिनेता करण सिंह ग्रोव्हरही (Karan Grover) त्याला अपवाद नाही. करण सिंह ग्रोव्हर आणि त्याची पत्नी अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) यांच्या घरी नोव्हेंबर 2022 मध्ये चिमुकलीचे आगमन झाले. बाळाच्या जन्माआधी बाळाच्या हृदयाला छिद्र आहे. या बातमीने करण आणि बिपाशा हादरले होते. मुलीच्या आजारपणामुळे फायटर चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाण्याची इच्छाही करणला होत नव्हती. 


करणने नुकत्याच एका मुलाखतीमध्येही बाब उघड केली. करणने म्हटले की, जेव्हा देवीच्या (Bipasha Karan Daughter Devi) आजारपणामुळे कळलं, तेव्हा एकदम मोठा डोंगर कोसळला असल्याचे वाटले. या बातमीने सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' च्या चित्रीकरणासाठी जाण्याची इच्छा होत नव्हती. 'इंडिया टुडे'च्या मुलाखती करण सिंह ग्रोव्हरने  फायटरच्या शुटिंग दरम्यानच देवीच्या आजारपणाबद्दल कळले असल्याचे सांगितले. 


 






करणने केले बिपाशाचे कौतुक 


अभिनेता करणने पत्नी बिपाशा बासूचे कौतुक केले. करणने म्हटले की, या आव्हानात्मक काळात बिपाशा एखाद्या वाघिणीसारखी उभी राहिली. एक वेळ अशी आली की आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि देवीला डॉक्टरकडे सोपवणार होतो. त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो असे करणने म्हटले. त्यावेळी माझ्या हाता-पायातील ताकद निघून गेली होती. बिपाशा खूपच धीराची असल्याचे करणने म्हटले. आई झाल्यावर ती भक्कम आधार झाली आहे. 










बिपाशा बसूने मागील वर्षी आपल्या मुलीच्या आजाराची माहिती दिली होती. देवीच्या हृदयात दोन छिद्र असल्याची माहिती बिपाशाने दिली होती. आता, तिच्यावर शस्त्रक्रिया झाली असून चिमुकलीची प्रकृती उत्तम आहे.