Kantara:   'कांतारा' (Kantara)   या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार? असा प्रश्न अनेकांना प्रेक्षकांच्या पडला होता. आता हा चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच ऋषभ शेट्टीनं एक व्हिडीओ शेअर करुन या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली.


मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ऋषभ शेट्टी आणि नेटफ्लिक्सच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक ऋषभला मेसेज करुन कांताराच्या हिंदी व्हर्जनबाबत विचारत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, ' ऋषभ शेट्टीने शेवटी "कंतारा हिंदीत कधी येत आहे?" या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. कांतारा 9 डिसेंबरला हिंदीत Netflix वर येत आहे.' 


पाहा व्हिडीओ: 






कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. 'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Kantara: कांतारा फेम ऋषभ शेट्टी 'या' चित्रपटात करणार नाही काम? अभिनेत्याला केलं जाऊ शकतं रिप्लेस