Rajinikanth : सिनेसृष्टीला कोरोनाचा मोठा फटका बसला. कोरोनाकाळात अनेक बिग बजेट सिनेमे सिने-रसिकांना सिनेमागृहात वळवण्यात कमी पडले. पण आता पुन्हा एकदा सिनेसृष्टीला सुगीचे दिवस येऊ शकतात. सुपरस्टार रजनीकांत यांचा (Rajinikanth) 'बाबा' हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात पाहता येणार आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असला तरी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहात वळताना दिसत नाहीत. सिने-रसिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत असल्याने थिएटर मालक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जुने सिनेमे पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येत आहेत. 






थलायवा रजनीकांत यांचा 'बाबा' हा सिनेमा 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा सिनेमागृहात पाहता येणार आहे. हा सिनेमा आता पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 






सुपरस्टार रजनीकांत यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा आता 10 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 10 डिसेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून या सिनेमाचे शो सुरू होणार आहे. या सिनेमाच्या तिकीटाची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. 


कमल सिनेमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. हा सिनेमा 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रजनीकांत यांच्यासह मनीषा कोईराला, सुजाता आणि अमरीश पुरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Kantara : 'चित्रपट पाहताना अंगावर शहारे आले’; ‘थलायवा’ रजनीकांतकडून ‘कांतारा’चं कौतुक!