'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट 19 व्या शतकातील झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यावेळी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीशी लढा या चित्रपटात दाखवला जाणार आहे.
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
अनेक महिन्यांपासून चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. क्रिश जगरलामुडी दिग्दर्शित 'मणिकर्णिका' चित्रपटाची निर्मिती कमल जैन आणि झी स्टुडिओने केली आहे. कंगनासोबतच निहार पांड्या, सोनू सूद या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात निहार दुसऱ्या बाजीरावांच्या भूमिकेत दिसणार आहे.
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
हा चित्रपट आधी 27 एप्रिल 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र तो 3 ऑगस्ट 2018 रोजी रिलीज होईलं असं सांगण्यात आलं. मात्र आता हा सिनेमा आता 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात लक्ष्मीबाई आणि एका ब्रिटीश व्यक्तीमध्ये प्रेमसंबंध दाखवल्याच्या आरोपावरुन वादाची ठिणगी पडली आहे.
कंगनाच्या डोक्याला 15 टाके
सिनेमातील तलवारबाजीचा सीन शूट केला जात होता, त्याचवेळी तलवार कंगनाच्या डोक्याला लागली आणि ती जखमी झाली. हैदराबादमध्ये या सिनेमाची शूटिंग सुरु होतं. या घटनेनंतर कंगनाला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या डोक्याला 15 टाके पडले होते.
संबंधित बातम्या
हृतिक- कंगना पुन्हा एकदा आमने सामने
'पद्मावत'नंतर कंगनाच्या 'मणिकर्णिका'विरोधात आंदोलन
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
दीपिकाचा एक्स निहार पांड्याचं कंगनासोबत बॉलिवूड पदार्पण
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका'मध्ये कंगनाचा रॉयल अंदाज