Kamal Haasan Vikram Success : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) सध्या चर्चेत आहे. कमल हासनचा 'विक्रम' (Vikram) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. पाच दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासनने चार वर्षांनी कमबॅक केलं आहे. 'विक्रम'च्या यशाने कमल हासन खूश झाले आहेत. त्यांनी सिनेमाच्या दिग्दर्शकाला खास आलिशान गाडी भेट दिली आहे. 


'विक्रम'च्या दिग्दर्शकाला दिली महागडी आलिशान गाडी भेट


'विक्रम'च्या यशाने कमल हासन खूश झाले आहेत. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. लोकेश कनगराज यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'विक्रम'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने कमल हासन यांनी लोकेश कनगराज यांना खास महागडी आलिशान गाडी भेट दिली आहे. या गाडीची किंमत 2.5 कोटी आहे. 


13 सहाय्यक दिग्दर्शकांना दिल्या महागड्या भेटवस्तू


रिपोर्टनुसार, कमल हासनने विक्रमच्या 13 सहाय्यक दिग्दर्शकांना अपाचे आरटीआर 160 मोटरसायकल भेट दिली आहे. सिनेमाला मिळालेले यश कमल हासन यांनी त्यांच्या टीमसोबत सेलिब्रेट केलं आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत. 


बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमे सुपरहिट


'पुष्पा', 'वलिमै', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता या यादीत 'विक्रम' सिनेमाचादेखील समावेश आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. रिलीजआधीच बजेटपेक्षा अधिक कमाई करणारा कमल हासन यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश कंगराजने सांभाळली आहे.


3 जूनला सिनेमा झाला प्रदर्शित


'विक्रम' हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कमल हासन व्यतिरिक्त विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचीदेखील झलक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत.  


संबंधित बातम्या


Vikram Box Office Collection : कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई


Trending Post : अमूलने डूडलद्वारे साजरे केले 'विक्रम'चे यश! बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई