Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सध्या तिच्या तेजस (Tejas) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज (27 ऑक्टोबर) कंगनाचा तेजस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तसेच कंगनानं काही दिवसांपूर्वी दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केले. 50 वर्षांच्या इतिहासात रावण दहन करणारी कंगना पहिली महिला ठरली आहे. अनेक जण कंगनाचे यानिमित्ताने कौतुक करत आहेत. पण भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)  यांनी मात्र ट्वीटच्या माध्यमातून कंगनावर टीका केली. आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्वीटला कंगनानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 


सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्वीट


सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्वीट रिट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये कंगनाचा  स्विमसूटमधील फोटो दिसत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,  "रामलीलेच्या शेवटच्या दिवशी कंगनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणे हे मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा अनादर केल्यासारखं आहे, हे एक प्रकारे चुकीचे आहे."


कंगनाचं सडेतोड उत्तर 


कंगनानं सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर केलेल्या ट्वीटला रिप्लाय दिला, "एक स्विमसूटमधील फोटो शेअर करुन तुम्ही अशा गोष्टी कशा सांगू शकता?  राजकारणात येण्यासाठी माझ्याकडे माझ्या देहाशिवाय दुसरे काहीही नाही, असे तुम्ही सुचवत आहात. मी एक कलाकार आहे, हिंदी चित्रपटांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. माझ्या जागी एखादा तरुण असता तर राजकारणात येण्यासाठी कदाचित तो शरीर विकतोय, असे तुम्ही म्हणाल का?


पुढे कंगनानं ट्वीटमध्ये लिहिलं, "खोलवर रुजलेली लैंगिकता आणि स्त्री शरीराची सुप्त लालसा तुम्हाला विकृत बनवते. स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात, त्यांच्याकडे इतर अवयव असतात जसे की, मेंदू, हृदय, हात, पाय आणि इतर सर्व काही जे पुरुषाकडे असते किंवा एक महान नेता होण्यासाठी आवश्यक असते." कंगनाच्या या ट्वीटनं सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे.






इतर महत्वाच्या बातम्या:


Kangana Ranaut Trolled: लाल किल्ल्यावर रावण दहनावेळी कंगनाचा नेम चुकला; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीची उडवली खिल्ली, म्हणाले...