Kangana Ranaut Upcoming Film:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सध्या  तिच्या 'तेजस'  या आगामी चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. त्यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच कंगनाची भेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल  (Ajit Doval) यांच्यासोबत झाली आहे. या अचानक झालेल्या भेटीचे फोटो कंगनानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


कंगनानं शेअर केले फोटो


कंगनानं ट्विटवर अजित डोवाल यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'नशिब किती कमाल आहे, आज सकाळच्या फ्लाईटमध्ये मला श्री अजित डोवालजी यांच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली, तेजस चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मला सरांना भेटण्याची संधी मिळाली. जे प्रत्येक सैनिकाचे प्रेरणास्थान आहेत अशा अजित डोवाल सरांना मला भेटायला मिळाले. मी हे चांगले शगुन मानते.जय हिंद'






 तेजस चित्रपट कधी होणार रिलीज?


 सर्वेश मेवाडा यांनी तेजस या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून रॉनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकाणार आहे. काही दिवसांपूर्वी तेजस या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच "भारत को छेडेंगे तो छोडेंगे नहीं" हा कंगनाचा  दमदार डायलॉग ऐकू येतो. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.


कंगनाचे आगामी चित्रपट 


कंगनाचे इमर्जन्सी (Emergency)  आणि तेजस हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  इमर्जन्सी  या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. इमर्जन्सी या चित्रपटात कंगनासोबतच  अनुपम खैर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Kangana Ranaut : कंगना रनौतच्या 'Tejas' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज! वायुसेना स्थापना दिनी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ