Kangana Ranaut And Sandeep Singh Movie : बॉलिवूड सिनेसृष्टी सध्या बहरली आहे. दररोज वेगवेगळ्या दर्जाच्या सिनेमांची घोषणा होत आहे. अशातच आता बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतने (Kangana Ranaut) तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. संदीप सिंहने (Sandeep Singh) या सिनेमाची निर्मिती केली आहे. 


कंगना रनौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. पण अद्याप या सिनेमाचं नाव काय असणार, कोण दिग्दर्शित करणार यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चाहत्यांना मात्र कंगनाच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा आहे.     


कंगना रनौतची खास पोस्ट (Kangana Ranaut Shared Special Post)


कंगना रनौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे,"संदीप आणि मी एकमेकांचे चांगले मित्र असून गेल्या 13 वर्षांपासून आमची खूप घट्ट मैत्री आहे. एकत्र काम करण्यासाठी आता आम्हाला एक चांगला विषय आणि पात्र मिळालं आहे". 






कंगनाने पुढे लिहिलं आहे,"लवकरच आमच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. हा माझ्या आतापर्यंतच्या करिअरमधला एक बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमातील माझं पात्र खूप हटके असणार आहे. या सिनेमासंदर्भात लवककरच आणखी अपडेट्स देऊ". 


संदीप सिंहने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या कंगना रनौतसोबत काम करणं म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखं आहे. गेल्या एका दशकापासून मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे". 


कंगना रनौतच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Project)


कंगनाचा 'टीकू वेड्स शेरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. हा सिनेमा 23 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच तिच्या 'इमरजन्सी' या सिनेमाचा टीझरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


Emergency Teaser Out : "इंदिरा इज इंडिया..."; कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा दमदार टीझर आऊट!