72 Hoorain : '72 हुरैन' (72 Hoorain) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमा रिलीज होण्याआधीच या सिनेमाचा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाने निर्माते मात्र हैराण झाले आहेत. 


नेमकं प्रकरण काय? 


गेल्या काही दिवसांपूर्वी '72 हुरैन' या सिनेमाची घोषणा झाली होती. धर्मांतरण, दहशतवादी संघटना आणि निष्पाप लोकांचे ब्रेनवॉश करुन त्यांच्याकडून दहशतवादी काम कसं करुन घेतलं जातं, अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा '72 हुरैन' हा सिनेमा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर पास करण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. त्यांनी या सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. 


'72 हुरैन'च्या ट्रेलरमधून ‘कुराण का’ शब्द वगळण्यासोबतच बामम्बस्फोटाच्या दृश्यात तुटलेला पाय दृश्य काढण्याचे सेन्सॉर बोर्डाने आदेश दिले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य अशा मुद्द्यांवर वाद सुरू झाला आहे. त्यामुळे आता '72 हुरैन' या सिनेमाचे निर्माते हैराण झाले असून आता ते सेन्सॉर बोर्डाच्या वरिष्ठांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. 






सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट न दिल्याने '72 हुरैन' हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकत नाही. आज निर्मात्यांनी डिजिटल पद्धतीत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. 


'72 हुरैन' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पूरण सिंह यांनी सांभाळली आहे. त्यांना आजवर दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. किरण डागर, गुलाब सिंह तन्वर, अनिरुद्ध तन्वर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच अशोक पंडित या बहुचर्चित सिनेमाचे सहनिर्माते आहेत. 


'72 हुरैन'च्या टीझरमध्ये ओसाम बिल नादेन, अजमल कसाब, याकूब मेनन, मसूद अझहर, हाफिज सईद, सादिक सईद, बिलाल अहमद आणि हकीम अली यांसारख्या अनेक दहशतवाद्यांची नावं या टीझरमध्ये घेण्यात आली आहेत.  आता सेन्सॉर बोर्डाने '72 हुरैन'च्या प्रदर्शनावर बंदी घातल्याने निर्माते काय पाऊल उचलणार आणि या सिनेमाच्या कमाईवर या सर्व गोष्टींचा काय परिणाम होईल हे पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या


Julian Sands : पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले अभिनेते ज्युलियन सँड्सच्या मृत्यूचे गूढ वाढले, कॅलिफोर्नियाच्या डोंगरावर सापडले अवशेष