The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story)  हा चित्रपट चर्चेत आहे.  अनेकांनी या चित्रपटावर टीका केली तर काही जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना अभिनेता कमल हसन (Kamal Haasan) यांनी 'द केरळ स्टोरी' हा प्रपोगंडा   फिल्म असल्याचे म्हटले. आता कमल हसन यांच्या या वक्तव्यावर द केरळ स्टोरी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाले सुदीप्तो सेन? 



सुदीप्तो सेन म्हणाले,  "मी अशा विधानांवर प्रतिक्रिया देत नाही, पूर्वी मी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचो, पण आज मी तसे करत नाही कारण ज्या लोकांनी या चित्रपटाला प्रपोगंडा फिल्म म्हटले आहे, ते चित्रपट पाहिल्यानंतर चांगली प्रतिक्रिया देत आहेत. ज्यांनी चित्रपट पाहिला नाही ते त्यावर टीका करत आहेत. तशाच प्रकारे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये देखील झाले. या लोकांनी चित्रपट पाहिला नाही म्हणून त्यांना तसा प्रचार आहे असे वाटते. आपल्या देशात खूप मूर्ख स्टिरियोटाइप आहेत. आयुष्य हे ब्लँक अँड व्हाईट असावे, पण त्यांना माहित नाही की, जीवन कधी कधी ग्रे शेडमध्ये पण असते."


कमल हसन म्हणाले होते, "मी प्रपोगंडा चित्रपटांच्या विरोधात आहे. चित्रपटाच्या पोस्टर खाली 'सत्य कथा' अशी टॅगलाइन लावल्यानं काही होत नाही. तो चित्रपट खरंच 'सत्य कथेवर आधारित'  असावा. पण त्यामध्ये खरं नाहीये" कमल हसन यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 






'द केरळ स्टोरी' चित्रपटातील कलाकार


'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी या अभिनेत्रींनी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील  अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.  अदानं या चित्रपटात शालिनी ही भूमिका साकरली आहे. शालिनी ही फातिमा कशी होते? हे द केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 


द केरळ स्टोरी या चित्रपटाचा विरोध काही राज्यांमध्ये करण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अनेक लोक या चित्रपटाला 'प्रपोगंडा  फिल्म' म्हणत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया