Kalki Kochlin: बॉलिवूडचा सुपरहीट सिनेमा ये जवानी है दिवानी अजुनही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहे. रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर, कल्की कोचलीन यांच्या धमाल स्टारकास्टनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बॉक्सऑफिसवर तगडी कमाईच नाही तर आजही या चित्रपटातील गाणी, डायलॉग न डायलॉग चाहत्यांच्या लक्षात राहिला. आता या सिनेमाचा सिक्वेल येणार का याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. ये जवानी है दिवानीच्या सिक्वेलविषयी कल्की कोचलिनला विचारलं असता, तिनं दिलेल्या मजेशीर उत्तरानं चांगलाच हशा पिकला होता.
असं म्हणाली तरी काय कल्की?
ये जवानी है दिवानी चित्रपटाच्या सिक्वेलविषयी कल्की कोचलिनला विचारलं असता तिनं मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली, जर YJHD चा सिक्वेल बनवायचा असेल तर त्याचं नाव ये जवानी है दिवानी नाही, ये बुजुर्गी है दिवानी असं ठेवलं पाहिजे. कारण आता आम्ही सगळेच वयस्कर झालो आहोत! कल्कीच्या या उत्तरानं सगळ्यांनाच हसवले.
गेल्या वर्षी चाहत्यांशी बातचीत करताना रणबीरनं ये जवानी है दिवानीच्या सिक्वेलच्या शक्यतेबद्दल एक हिंट दिला होता. तो म्हणाला होता, मला वाटतं ये जवानी है दिवानीचा चांगला सिक्वेल बनेल. आयानकडेही यासाठी एक खूप इंटरेस्टींग कथा आहे. मला आठवतंय, पण तो नंतर ब्रम्हास्त्रच्या कथेकडे वळला. पण नेव्हर से नेव्हर. तो कदाचित काही वर्षांनंतर बनवेल. मला वाटतं ही कथा दहा वर्षांनंतर बनी, नैना, अवी अदिती कसे जगतायत यावर असू शकते.असं रणबीर म्हणाला हेाता. आता पुन्हा एकदा ये जवानी है दिवानी चित्रपटाच्या सिक्वेलच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, कल्की म्हणाली, मी अशा कोणत्याही अफवा ऐकल्या नाहीत. बनी, नैना, अदिती आणि अवी यांचा एकदा तयार झालेला बाँड पाहता यांना पुन्हा बनवता येत नसतं असं कल्की म्हणाली.
11 वर्षांनंतर आजही YJHD चं स्थान अढळ
कल्कीच्या उत्तरावर सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता दिसत आहे. अनेकांनी सिक्वेल आला तर आम्ही थेएटर्समध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून असं लिहिलंय. २०१३ मध्ये आलेल्या या चित्रपटाला आता ११ वर्ष झाले आहेत. पण आजही या चित्रपटाविषयी आणि यातील पात्रांविषयी बोललं जातं. जर हा सिक्वेल आला, तर नक्की काय स्टोरी असेल, यातून नवीन पात्र येतील की जुन्या आठवणी दाखवण्यात येतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण एक मात्र खरं आहे – ‘ये जवानी है दिवानी’ चाहत्यांच्या हृदयात नेहमीच खास राहणार आहे.