कतरीनाचे 'ते' गाणे पाहणाऱ्यांची संख्या तब्बल 5 कोटींवर
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2016 03:31 PM (IST)
मुंबई: कतरीना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट 'बार बार देखो'मधील 'काला चष्मा' हे गाणे पाहणाऱ्यांची संख्या शनिवारी 5 कोटींहून अधिक झाली आहे. या गाण्यासाठी बादशाह, नेहा कक्कड, आणि इंदीप बख्शी यांनी आपला आवाज दिला आहे. हे गाणे 1990 साली प्रदर्शित झालेले पंजाबी गीत 'तैनु काला चष्मा जंचता वे'चे हिंदी व्हर्जन आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक करण जौहरने ट्विटरवरून ही माहिती दिली. ''पार्टी स्टार्टरवर आता राज्य करत आहे. हाफ सेंच्यूरीच्या रेकॉर्डची वेळ आहे. काला चष्माला तब्बल 5 कोटीवेळा पाहिले गेले. 'बार-बार देखो'.'' हे गीत यूट्यूबवर २६ जुलै रोजी ऑनलाईन पोस्ट करण्यात आले. कतरीना आणि सिद्धार्थ गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा जयची व्यक्तीरेखा साकारत आहे. तर दिया नावाची व्यक्तीरेखा कतरीना कैफ साकारत आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.