Kajal Aggarwal Anniversary : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवालच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. 
फोटोत छान पोज देताना दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आहे. फोटोत दोघांनी सारख्या रंगाचे कपडे घातले आहेत. 


काजल अग्रवालने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे,"मध्यरात्री तु झोपेत असतानादेखील मी तुझ्यावरच प्रेम करते. तुला आपल्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा". काजलच्या या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. हंसीका मोटवानी, रकुल प्रीत सिंग तसेच अनेक लोकप्रिय कलाकारांनीदेखील काजल आणि गौतमला शुभेच्छा दिल्या आहेत.






 


काजलच्या फोटोवर रकुल प्रीत सिंगने लिहिले आहे,"ए क्यूटीज लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. तुमचे एकमेकांवरचे प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट्ट होऊदेत".


गौतमने काजलला दिल्या शुभेच्छा
काजलच्या पतीने म्हणजेच गौतमने काजलसाठी एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये गौतमने लिहिले आहे,"आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी मी खूप उत्साहित आहे. प्रिये लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे एक वर्ष कसं सरलं ते मला कळलं नाही. माझ्या आयुष्यातील हा सर्वात आश्चर्यकारक नवीन अध्याय होता. जेव्हा तुमचा खास मित्र, 4 am मित्र, वर्कआउट मित्र आणि प्रवासी जोडीदार एकच असतो तेव्हा तुमचे आयुष्य सोपे होते.  आता पुढील प्रवासासाठीदेखील मी उत्सुक आहे".





 


 


30 ऑक्टोबर 2020 ला दोघे लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर हनिमूनसाठी ते मालदीवला गेले होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली होती. 


कालजचे आगामी प्रोजेक्ट
कालजने शेवटचा 'मुंबई सागा' सिनेमा केला होता. काजलचे  'हे ​​सिनामिका', 'घोस्टी', 'उमा', 'आचार्य', 'इंडियन 2' आणि 'पॅरिस पॅरिस' हे आगामी प्रोजेक्ट आहेत.