चेन्नईः सुपरस्टार रजनीकांतच्या 'कबाली' सिनेमाने एका दिवसात तब्बल 250 कोटींची कमाई केली आहे. केवळ तामिळनाडूमध्येच 'कबाली'ने 100 कोटींचा गल्ला जमवला असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. असं वृत्त इकोनॉमिक टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे.

 

 

'कबाली'ने केवळ भारतात 250 कोटींचा व्यवसास केला आहे. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये 100 कोटी आणि इतर राज्यातील कमाई 150 कोटी रुपये आहे, अशी चक्रावून सोडणारी माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

 

 

'कबाली' भारतात 12 हजार पेक्षा अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. तर परदेशातही सहा हजारपेक्षा जास्त स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. कबालीची वर्ल्डवाईड कमाई देखील 100 कोटी झाली असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. 'कबाली'ला वर्ल्डवाईड अमेरिका, कॅनडा, सिंगापूर आणि मलेशियात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

 

संबंधित बातम्याः

 

वर्ल्डवाईड 'कबाली' फीव्हर, पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडीत


कंडक्टर ते कबाली, रजनीकांतचा थक्क करणारा प्रवास


बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडीत, कबालीची कमाई तब्बल 55 कोटींवर