‘कासव’ सिनेमाचा संपूर्ण मुंबईत फक्त एकच शो!
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2017 11:55 PM (IST)
आज कासव हा चित्रपट रिलिज झाला. मात्र, मुंबईमध्ये फक्त माहीमच्या सिटीलाईट थिएटरमध्ये दुपारी तीन वाजता कासवचा एकमेव शो आहे.
मुंबई : कासव चित्रपटानं सुवर्णकमळ मिळवत पुरस्काराची शर्यत जिंकली. पण चित्रपटासाठी थिएटर मिळविण्याच्या शर्यतीत मात्र कासव मागे राहिला आहे. आज कासव हा चित्रपट रिलिज झाला. मात्र, मुंबईमध्ये फक्त माहीमच्या सिटीलाईट थिएटरमध्ये दुपारी तीन वाजता कासवचा एकमेव शो आहे. चित्रपटाच्या दर्जाच्या बळावर कासवनं राष्ट्रीय चित्रपटांमध्ये आपले स्थान निश्चित केलं. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शक जोडीच्या ‘कासव’ चित्रपटानं ‘सुवर्णकमळ’ पटकावलं होतं. पण आता अशा उत्कृष्ठ चित्रपटाला थिएटर मिळत नाही. ही शोकांतिका आहे.