मुंबई :  झी मराठीवरील ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या शोमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या आर्या आंबेकरचं पहिलं हिंदी सोलो गाणं रिलीज झालं आहे. 'कारे से' हे रोमँटिक गाणं यू ट्यूवर पाहायला मिळेल. टेलिस्कोप पिक्चर्स आणि फाऊंटन म्युझिक कंपनी निर्मित 'कारे से' या गाण्याला देवेंद्र भोमेने संगीत दिलं आहे. तर रोहित निकमने ते शब्दबद्ध केलं आहे. आर्याने तिच्या मधूर आवाजाने गाण्याला चारचांद लावले आहेत. 'अलवार माझे मन बावरे'
काही महिन्यांपूर्वी आर्याचं 'अलवार माझे मन बावरे' हे गाणं रिलीज झालं होतं. शिवाय अल्बमच्या व्हिडीओमध्ये ती स्वतः झळकली होती. या गाण्यात आर्याचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला होता. आर्या लवकरच चित्रपटात
इतकंच नाही तर गायनामध्ये यशस्वी झाल्यानंतर आर्या आता अभिनयातही नशीब आजमावणार आहे. आर्या लवकरच 'रंगीला रे' या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. पाहा व्हिडीओ