सूडकथेचा प्रवास, हृतिकच्या 'काबील'चा नवा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 09:05 AM (IST)
मुंबई : सुपरस्टार हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेल्या 'काबील' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अंध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हृतिक आणि यामी यांची सूडकथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातील अत्यंत तरल असणाऱ्या भावना अखेर गडद होत जाताना दिसतात. रोनित रॉय यात खलनायकाची भूमिका साकारत असून त्याच्यामुळे यामी-हृतिकच्या लव्हस्टोरीला अनोखं वळण मिळतं. अर्थात सूडाचं कारण गुलदस्त्यात ठेवण्यात दिग्दर्शक संजय गुप्ता यशस्वी झाले आहेत. हृतिक आणि यामी यांची केमिस्ट्री चांगली जुळून आल्याचं दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना दोघांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे. राकेश रोशन यांच्या 'फिल्मक्राफ्ट'ची निर्मिती असलेला 'काबील' 25 जानेवारीला रिलीज होत आहे. संजय गुप्ता यांचे जज्बा, शूटआऊट अॅट वडाला, कांटे, दस कहानिया, जिंदा यासारखे चित्रपट गाजले आहेत. त्यामुळे 'काबील'ही असाच रोमँटिक आणि अॅक्शनपॅक्ड असेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. पाहा ट्रेलर :