मुंबई : कॅनडियन पॉपस्टार जस्टिन बिबर भारतात दाखल झाला आहे. मध्यरात्री मुंबई विमानतळावर जस्टिन बिबरचं आगमन झालं. यावेळी त्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर जस्टिच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे. कॉन्सर्टला 50 हजार चाहते उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे डी. वाय. पाटील परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी कमीत कमी 5 हजार 40 रुपये तिकीट आहे, तर प्लॅटिनम तिकीट 15 हजार 400 रुपयांपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे.

जस्टिनच्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही परफॉर्म करणार आहे. गायक कैलाश खेर, अरमान मलिक आणि सोना महापात्रासारख्या अनेक दिग्गजांनी विरोध केला आहे.

कोण आहे जस्टिन बिबर?

बेबी…बेबी… हे गाणं जर कोणी ऐकलं-पाहिलं असेल, तर त्याला जस्टिन बिबर कोण हे सांगण्याची गरज नाही.

जस्टिन बिबर हा जगभरात गाजलेला पॉप गायक आहे. अवघ्या 23 वर्षांच्या जस्टिन बिबरचा जन्म कॅनडात 1994 मध्ये झाला.

जस्टिन बिबर तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचीच झलक ट्विटरवर पाहायला मिळते. ट्विटरवर जस्टिन बिबरचे 9 कोटी 34 लाख 42 हजार फॉलोअर्स आहेत.

2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी


एकेकाळी जस्टिन बिबरसोबत सेल्फी काढण्यासाठी 2000 डॉलर अर्थात लाखापेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागत.

जस्टिन बिबरने मानाचा ग्रॅमी अवॉर्ड पटकावला आहे. इतकंच नाही तर जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने त्याला तीन वेळा जगातील सर्वात पॉवरफुल सेलिब्रिटी म्हणून गौरवलं आहे.

सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड!


गेल्या 5 वर्षात जस्टिन बिबर हे नाव सातत्याने ऐकायला मिळालं. पूर्वी लोक हे नाव ऐकून न ऐकल्यासारखं करायचे, मात्र आता त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत.

 जस्टिन बिबरकडे डिजीटल मीडियातील एक सक्सेस स्टोरी म्हणून पाहिल जातं. कारण 2008 मध्ये त्याचे काही यूट्यूब व्हिडीओ समोर आले आणि एका टॅलेंट मॅनेजरने त्याचे पाय पाळण्यात ओळखले.

भारतात येण्यापूर्वी सनी लिओनीचा जस्टीन बीबरला खास सल्ला


जस्टिन बिबरचा 2010 मध्ये एक स्टुडिओ अल्बम रिलीज झाला आणि तो रातोरात स्टार झाला.