Karan Johar Jug Jugg Jeeyo 2 Update : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'जुग जुग जियो' (Jugg Jugg Jeeyo) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 24 जून 2022 रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून आता या सिनेमाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. दरम्यान 'जुग जुग जियो' या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत 'जुग जुग जियो' या बहुचर्चित सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) मुख्य भूमिकेत होते. 


राज मेहता दिग्दर्शित 'जुग जुग जियो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाला होता. आता या सिनेमासंदर्भात करण जोहरने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. 'जुग जुग जियो' या सिनेमातील एका दृश्याचा फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"या सिनेमाच्या सीक्वेलची आता प्रतीक्षा आहे".


 


'जुग जुग जियो 2' या सिनेमात वरुण धवन आणि कियारा आडवाणी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. वरुण आणि कियारा दोघेही करणच्या खूप जवळचे आहेत. त्यामुळे दुसऱ्या भागासाठीदेखील करण त्यांना विचारणा करू शकतो. नीतू कपूर आणि अनिल कपूर 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसले. या सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. आता प्रेक्षकांना 'जुग जुग जियो 2'ची उत्सुकता आहे.






करणच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता


करण जोहर सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Or Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा 28 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Jug Jugg Jeeyo Box Office : 'जुग जुग जियो'चा विकेंड धमाका; पार केला 100 कोटींचा टप्पा