John Abraham Met Manu Bhaker : ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) दैदिप्यमान कामगिरी केलेली स्टार नेमबाज खेळाडू मनू भाकर (Manu Bhaker) भारतात परतली आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने मनू भाकरची भेट घेतली. नेमबाजीमध्ये भारतासाठी दोन पदकं जिंकून मनू भाकरने याआधीच इतिहास रचला आहे. मात्र, 25 मीटर नेमबाजीत तिला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानवे लागले. नेमबाजीमध्ये मनू भाकरने दोन कांस्य पदकं पटकावली आहेत.  


जॉन अब्राहमने घेतली मनू भाकरची भेट


ऑलिम्पिकमध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी मनू भाकर भारतात परतली असून तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळावर तिचं ढोल-ताशाच्या तालावर स्वागत करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यानेदेखील मनू भाकरची भेट घेतली आहे. पण, मनू भाकरची भेट घेतल्यानंतर जॉन अब्राहम ट्रोल झाला आहे. 


जॉन अब्राहमने शेअर केला मनू भाकरसोबतचा फोटो






भारतात आल्यानंतर जॉन अब्राहमने मनू भाकरची भेट घेतली. जॉन अब्राहमने मनूसोबतचा स्वतःचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जिंकलेली दोन्ही पदके दाखवत आहे. जॉन अब्राहमनेही आपले पदक राखले आहे. जॉन अब्राहमने मनू भाकर तसेच त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर भेटीचा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं की, 'मनु भाकर आणि तिच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. तिने भारताचा मान वाढवला आहे. Respect'.


जॉन अब्राहमला नेटिझन्सनी केलं ट्रोल




मनुसोबत फोटो शेअर करताच जॉनवर नेटकरी भडकले


जॉन अब्राहमने मनु भाकरसोबतचा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींना या फोटो खूप आवडला असून त्यांनी याचं कौतुक केलं आहे. तर काही नेटिझन्स जॉन अब्राहमवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळत आहे. एका युजरने लिहिलं आहे, "बाकी सगळं ठीक आहे, पण, तिने जिंकलेलं मेडलं तू पकडायला नको होतं." दोन्ही मेडल पकडण्यासाठी तिचे दोन हात आहेत. आणखी एकाने लिहिलं की, "कुणालाही मेडल पकडण्याची परवानगी द्यायला नको. मेडल जिंकणं आणि त्यासोबत पोझ देणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत". अशाप्रकारे काही नेटकऱ्यांनी जॉन अब्राहमला ट्रोल केलं आहे. 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Riteish Deshmukh Fees : बिग बॉस मराठीसाठी रितेश देशमुखची फी महेश मांजरेकरांपेक्षा दुप्पट, नेमकं मानधन जाणून घ्या