Jhimma Trailer Release : झिम्मा सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा 'झिम्मा' हा मराठीतील पहिला बिग बजेट सिनेमा असणार आहे. त्यामुळे मराठी सिनेप्रेक्षकांना आता लवकरच सिनेमागृहात जाऊन झिम्माच्या खेळात सहभागी होता येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. टिझरलादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. झिम्मा सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 


वेगवेगळी पार्श्वभूमी, निराळ्या आवडीनिवडी आणि विविध वयोगटातील अनोळखी स्त्रिया सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यादरम्यान त्यांच्यात होणारी धमाल,मजा म्हणजे 'झिम्मा' हा सिनेमा आहे. या सिनेमातील स्त्रिया सिनेमात मजा-मस्ती, एकमेकींची काळजी आणि मानसिक धैर्य देताना दिसून येत आहेत. 


आपण आयुष्यातली मजा आपल्या नकळत कशी हरवून बसतो 'झिम्मा' या सिनेमात अधोरेखित करण्यात आले आहे. 'चूल आणि मूल' या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात, तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते, त्यामुळे प्रत्येक महिलेने पाहावा, असा हा चित्रपट आहे. हा सिनेमा म्हणजे एक कौटुंबिक सिनेमा आहे.


 


या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे विविध वयोगटातील अभिनेत्रींनी नटलेला हा चित्रपट असणार आहे. या सर्व अभिनेत्रींसोबत चित्रपटाची शान वाढवायला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरदेखील दिसणार आहे. 


'झिम्मा' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. अमितराज यांनी या चित्रपटाचे संगीत केले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. चलचित्र कंपनी प्रस्तुत अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी प्यू फिल्मस निर्मित 'झिम्मा' हा सिनेमा आहे.


'झिम्मा' सिनेमाविषयी हेमंत ढोमे म्हणतो,"दिग्दर्शक म्हणून इंग्लंडमध्ये चित्रित होणारा हा माझा तिसरा चित्रपट आहे. 'झिम्मा'साठी मी खूपच उत्सुक आहे. या सिनेमात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा उलगडा 'झिम्मा' पाहिल्यावरच होईल".  


विकी कौशल-कतरिनाच्या 'संसारा'ची तयारी सुरु; तब्बल 'एवढे' लाख रुपये भाडे देऊन घेतले घर