Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू असला तरी यंदाचं पर्व खूपच मनोरंजनात्मक आहे. या पर्वात अनेक ट्विस्ट येत आहेत. नुकतच या पर्वात बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीत भाव खाऊन जाणाऱ्या ओरीने (Orry) हजेरी लावली होती. दोन दिवसातच तो भाईजानसाठी वेडा झाला असून त्याच्या आगामी सिनेमात काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. 


'बिग बॉस 17' या बहुचर्चित कार्यक्रमात ओरी दोन दिवसांसाठी सहभागी झाला होता. घरातील सर्वच स्पर्धकांसोबत ओरीने खूप मस्ती केली. 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने या घरातील अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 






'बिग बॉस 17'मध्ये ओरीला सगळ्यात जास्त होस्ट सलमान खान (Salman Khan) आवडला आहे. या पर्वात त्याने भाईजानसोबत अनेक मजेशीर गोष्टी शेअर केल्या. ओरीला सलमान खूपच आवडला आहे. त्याने भाईजानसोबत सिनेमात काम करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे.


सलमानच्या 'या' सिनेमात ओरी करणार काम


'बिग बॉस 17'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत ओरीने सलमान खानसोबत (Salman Khan) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल, असा प्रश्न ओरीला विचारण्यात आला. त्यावेळी त्याने सलमानच्या 'बजरंगी भाईजान 2' या सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 


ओरी झालाय सलमानचा फॅन!


ओरी पुढे म्हणाला,"कुक-डू-कू' या गाण्यावर थिरकण्याची माझी इच्छा आहे. 'बिग बॉस'च्या घरात दररोज सकाळी मला हे गाणं ऐकायला मिळत होतं. तसेच 'ओ ओ जाने जाना' या गाण्यावर डान्स करायलाही मला आवडेल. एकंदरीत सलमान खानच्या कोणत्याही सिनेमाच्या सीक्वलमध्ये काम करायला मला आवडेल. भाईसोबत स्क्रीन शेअर करण्याची माझी इच्छा आहे. भाईजानसोबत मी खूप मजा केली आहे".


'बिग बॉस'च्या घरात ओरीचा जलवा


'बिग बॉस 17'मध्ये ओरीचा जलवा पाहायला मिळाला आहे. या घरात त्याने दोन दिवस घालवले असले तरी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घरातील स्पर्धकांनी ओरीसाठी दिल, दिमाग आणि दम अशा तीन विभागांमध्ये खास वेलकम पार्टी आयोजित केली होती. या तिन्ही पार्ट्यांमध्ये ओरी सहभागी झाला होता. पण यासगळ्यात 'दिल'ने दिलेली पार्टी ओरीला जास्त आवडली. 


संबंधित बातम्या


Orry: पार्टीमध्ये लोकांना चिकटतो, फोटोसेशन करतो अन् 'ओरी' एवढे पैसे कमावतो; आकडा ऐकून भाईजानही झाला शॉक