Jawan Song Zinda Banda:  अभिनेता शाहरुख खानच्या

  (Shah Rukh Khan)  जवान  (Jawan)  या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटाचा प्रीव्यू काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या प्रीव्यूमध्ये शाहरुखचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. आता या जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा'  (Zinda Banda) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यामध्ये शाहरुख हा अनेक डान्सर्ससोबत डान्स करताना दिसत आहे.


शाहरुखनं 'जिंदा बंदा' या गाण्याबद्दल एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये शाहरुखनं लिहिलं,  'उसूलों पर जहाँ आँच आए टकराना ज़रूरी है,जो ज़िंदा हो तो फिर ज़िंदा नज़र आना ज़रूरी है।  वसीम बरेलवी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की, त्यांनी आम्हाला  हा सुंदर शेर किरकोळ बदलासह वापरू दिला. जिंदा हे गाणे इर्शाद कामिल सर यांनी लिहिले आहे. तर या गाण्याला संगीत अनिरुद्ध यानं दिलं आहे.'






'जिंदा बंदा' या गाण्यात शाहरुखसोबतच सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य या अभिनेत्री देखील थिरकताना दिसत आहेत. या गाण्यामध्ये शाहरुख हा रेड शर्ट ब्लॅक पँट आणि गॉगल अशा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. गाण्याच्या शेवटच्या भागात शाहरुख हा व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसतो.  'जिंदा बंदा' या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर शोबीनं केली आहे.


पाहा गाणं:



जिंदा बंदा हे गाणं हिंदी भाषेबरोबरच तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये देखील रिलीज झालं आहे. जिंदा बंदा या गाण्याचं तमिळमध्ये वंदा आदम असं नाव आहे तर तेलुगूमध्ये धुम्मे धुलीपेला असं नाव आहे.


शाहरुखचा  जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे.  जवान (Jawan) या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती  हे कलाकार ​​महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.  अॅटलीनं जवान या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गौरी खाननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुखचे चाहते जवान या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


शाहरुखच्या जवान या चित्रपटाबरोबरच डंकी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.  आता त्याच्या जवान आणि डंकी या चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Jawan Prevue : शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार अॅक्शन मोडमध्ये; प्रीव्यूमध्ये दिसली झलक