Ashok Saraf : अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नुकताच 75 वा वाढदिवस साजरा झाला असून त्यानिमित्ताने त्यांचं 'मी बहुरूपी' हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पुस्तकातून मिळालेला निधी त्यांनी वयोवृद्ध कलावंत आणि रंगमंच तंत्रज्ञ यांना दिला आहे. 


अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी 'कृतज्ञ मी... कृतार्थ मी' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम नसून 20 ज्येष्ठ रंगकर्मांचा कृतज्ञतासन्मान सोहळा होता. ज्येष्ठ रंगकर्मींनी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अशोक सराफ यांनी त्यांचा सन्मान केला आहे. अभिनेता अतुल परचुरे आणि डॉ. मृण्मयी भजक यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. 


'कृतज्ञ मी... कृतार्थ मी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशोक सराफ यांनी 20 रंगकर्मींना प्रत्येकी 75 हजार रुपये देत त्यांचा सन्मान केला. सन्मान सोहळ्यादरम्यान अशोक सराफ म्हणाले,"मी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा कळत नकळत अनेकांनी मला मदत केली. हे मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. आता या माणसांना आपण काहीतरी भेट द्यावी म्हणू आम्ही आमच्या कुटुंबाकडून त्यांना भेट दिली आहे". 






अशोक सराफ पुढे म्हणाले,"यातून त्यांना आनंद झाला असेल तर त्याने मला कृतार्थ झाल्यासारखे वाटेल. या इंडस्ट्रीतील लोक आज आहेत उद्या नसतील पण कोणीतरी या लोकांच्या मागे उभं राहायला हवं असं मला वाटतं, ही आमची कोणालाही मदत म्हणून नाही तर ती त्यांच्यासाठी एक भेट आहे". अशोक सराफ यांचा 4 जूनला 75 वा वाढदिवस पार पडला आहे. त्यावेळी पुस्तक प्रकाशना सोहळ्यादरम्यान त्यांनी निवेदिता सराफ यांनी ही कल्पना सांगितली होती. 


अशोक सराफ यांनी 'या' रंगकर्मींचा केला सन्मान


उपेंद्र दाते (अभिनेते), बाबा (सुरेश) पार्सेकर (नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार), अर्चना नाईक (अभिनेत्री), वसंत अवसरीकर (अभिनेते), दीप्ती भोगले (गायिका-अभिनेत्री), नंदलाल रेळे (ध्वनिसंयोजक), अरुण होर्णेकर (दिग्दर्शक-निर्माते), प्रकाश बुद्धिसागर (दिग्दर्शक), पुष्पा पागधरे (पार्श्वगायिका), वसंत इंगळे (अभिनेते), सुरेंद्र दातार (संयोजक-निर्माते), किरण पोत्रेकर (लेखक-दिग्दर्शक), शिवाजी नेहरकर (लोकनाट्य कलावंत), हरीश करदेकर (नाट्यकलावंत), सीताराम कुंभार (नेपथ्य व्यवस्थापक), विष्णू जाधव (नेपथ्य साहाय्यक), एकनाथ तळगावकर (नेपथ्य सहायक), रवींद्र नाटळकर (नेपथ्य सहायक), विद्या पटवर्धन (अभिनेत्री), उल्हास सुर्वे (नेपथ्य सहाय्यक)