Vijay Sethupathi : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. इंडस्ट्रीमध्ये आपल्या खलनायकी अंदाजाने त्याने चांगलीच ओळख निर्माण केली आहे.  एक उत्कृष्ट अभिनेता होण्यासाठी सिक्स ऐब्स, बॉडी आणि चांगलं दिसण्याची गरज नाही हे त्याने सिद्ध करुन दाखवलं आहे. 'जवान'मधील काली गायकवाड या भूमिकेच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच त्याच्या साधेपणाचंही कौतुक होतं. विजय सेतुपतीने अभिनेत्री कृती शेट्टीसोबत (Krithi Shetty) काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामागे त्याचं बाप-मुलीचं नातं होतं. 


'जवान' (Jawan) चित्रपटाच्या यशानंतर विजय सेतुपतीची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली होती. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कृती शेट्टीसोबत काम करण्यास नकार दिल्याचं कळवलं होतं. यामागे त्यांच्यातील वडील-मुलीचं नातं होतं. कृतीने ज्यावेळी आपल्या करिअरची सुरुवात केली होती त्यावेळची ही गोष्ट आहे. कृती शेट्टीचा पहिला चित्रपट 'उप्पेना' होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत विजय सेतुपतीदेखील होता. या चित्रपटात त्याने कृतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.


कृतीला मुलीसमान मानायचा विजय


'लाभास' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय सेतुपतीने कृतीसोबतचा एक किस्सा शेअर केला होता. एका सिनेनिर्मात्याला कृती शेट्टी आणि माझ्यासोबत चित्रपट बनवायचा होता. पण विजयला कृतीसोबत काम करणं अवघड वाटत होतं. याआधी कृतीने विजयच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटानंतर विजयने कृतीला आपल्या लेकीचा दर्जा दिला होता. कृतीला मुलासमान मानत असल्यानेच विजयने तिच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर ऋुती हासनला चित्रपटासाठी विचारणा झाली. 'लाभस' शूटिंगदरम्यानचा हा किस्सा आहे. 


विजय एकाचवेळी करायचा दोन चित्रपटांचं शूटिंग


विजय सेतुपती 'लाभास' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान म्हणाला होता की,निर्मात्यांनी जेव्हा मला कृतीच्या अपोझिट काम करण्यासाठी विचारणा केली तेव्हा मी स्पष्ट नकार दिला. त्यावेळीच 'उप्पेना'चंही शूटिंग सुरू होतं. या चित्रपटात कृती त्याच्या लेकीच्या भूमिकेत होती. एका चित्रपटात लेक आणि एका चित्रपटात प्रेयसी असल्यामुळेच विजयने नकार दिला होता. 


संबंधित बातम्या


Merry Christmas OTT : कतरिना कैफ अन् विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल