Nayanthara Twins Kids Name: सुपरस्टार  नयनतारा   (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत झालेल्या ग्रँड लग्न सोहळ्यानंतर हे जोडपे विशेष चर्चेत होते. आता लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली. आता नयनतारानं एका कार्यक्रमामध्ये तिच्या जुळ्या मुलांची नावं चाहत्यांना सांगितली आहेत. 


नयनतारानं चेन्नईमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमामधील नयनताराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नयनताराच्या एका चाहत्यानं ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नयनतारा तिच्या जुळ्या मुलांची नावे सांगताना दिसत आहे. नयनताराच्या एका मुलाचं नाव उयिर रुद्रोनिल एन शिवन आणि दुसऱ्या मुलाचे नाव उलग धैवाग एन शिवन असं आहे. 






नयनतारा आणि विग्नेश शिवन  हे त्यांच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.  काही दिवसांपूर्वी नयनतारा आणि विग्नेश यांनी सोशल मीडियावर त्यांच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,  ‘नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्हाला जुळे मुलगे झाले आहेत. आपल्या सर्वांच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद या दोन जुळ्या मुलांच्या रूपाने आमच्या आयुष्यात आले आहेत.' 'नयनतारा बियोंड द फेरी टेल' या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनतारा आणि विग्नेश यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.


नयनताराचा आगामी चित्रपट
नयनतारा  ही जवान या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामध्ये नयनतारा ही मुख्य भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. शाहरुखचा जवान हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच जवान या चित्रपटात विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.



वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Nayanthara Beyond The Fairy Tale teaser: नयनतारा अन् विग्नेशच्या प्रेमाची कथा; नेटफ्लिक्सनं शेअर केला 'नयनतारा बियोंड द फेरी टेल' चा टीझर