Javed Akhtar : लोकप्रिय लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर याप्रकरणी मुलुंड न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. आज यावर सुनावणी होणार होती. पण जावेद अख्तर आज न्यायालयात येऊ न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 


जावेद अख्तर आजारी असल्यामुळे न्यायालयात येऊ शकले नाहीत. त्यामुळे आता 20 एप्रिल 2023 रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. 20 एप्रिलला जावेद अख्तर यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. जर 20 एप्रिललादेखील जावेद अख्तर न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केली जाण्याची शक्यता आहे.


नेमकं प्रकरण काय? 


जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. तसेच त्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या लोकांना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. एका मुलाखतीत अख्तर म्हणाले होते की,"आरएसएस, बजरंग दल आणि तालिबान सारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही फरक नाही. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात भारतीय संविधान एक अडथळा बनत आहे. परंतु जर संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील".


जावेद अख्तर पुढे म्हणाले होते,"आरएसएस आणि तालिबान दोघांमध्ये फक्त नावाचा फरक आहे. दोघांची मानसिकता सारखीच आहे. तालिबानला इस्लामिक राज्य निर्माण करायचं आहे. तर दुसरीकडे यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. या लोकांना मुलगा आणि मुलगी एकत्र उद्यानात जाऊ नये असं वाटतं. दोघांमधील फरक इतकाच आहे की ते अद्याप तालिबानइतके शक्तिशाली नाहीत, पण तालिबानी लोकांच्या ध्येयासारखचं यांचंदेखील ध्येय आहे". 


जावेद अख्तर म्हणाले की, "ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत."


भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट तालिबानचे समर्थन करतोय असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं. जावेद अख्तर म्हणाले की, "तालिबान आणि त्यांच्या सारखं वागायची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याचं स्वागत केलं आहे. भारतातील मुस्लिम तरुण हे चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टीच्या मागे लागले आहे. पण मुस्लिमांचा एक लहानसा गट असा आहे की जे स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात."


संबंधित बातम्या


Javed Akhtar: जावेद अख्तर यांना लंडनच्या विद्यापिठाकडून मानद पदवी बहाल