दरम्यान, श्रीदेवीच्या जुन्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत श्रीदेवी आई बनण्याच्या अनुभवापासून ते आई बनल्यानंतरच्या जबाबदाऱ्यांपर्यंत सांगत आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याने हा व्हिडीओ शेअर केला असण्याची शक्यता आहे.
जान्हवीलाही आपल्या आईची आठवण येणं स्वाभाविक आहे. तिने इंस्टाग्रामवर बालपणीचा फोटो शेअर करुन आईची आठवण काढली.
जान्हवीचा पहिला बॉलिवूड सिनेमा 'धडक' लवकरच रिलीज होणार आहे. जान्हवीने सिनेमात काम करावं, अशी श्रीदेवीची अगोदर इच्छा नव्हती. मात्र नंतर ती यासाठी तयार झाली. जान्हवीच्या सिनेमासाठी श्रीदेवी उत्सुक होती. जान्हवीचा वाढदिवस काही दिवसांवर आलेला असल्यामुळेच श्रीदेवी दुबईत मागे थांबून तिच्यासाठी शॉपिंग करणार होती. मात्र दुर्दैवाने बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला.