Janhvi Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. जान्हवी आणि शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण 8  या शोमध्ये जान्हवी शिखरबद्दल भरभरुन बोलली.  डेटिंगच्या चर्चेदरम्यान आता जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर येथे दर्शनासाठी गेली आहे. जान्हवी आणि शिखरचा मंदिरात जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


जान्हवी आणि शिखरचा व्हिडीओ व्हायरल


ANI च्या ट्विटर अकाऊंटवर जान्हवी आणि शिखर या दोघांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. जान्हवी ही गोल्डन कलरची साडी आणि गोल्डन स्टोनची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे तर शिखर पांढऱ्या धोती-कुर्त्यामध्ये दिसत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.






जान्हवीनं शेअर केले फोटो 


जान्हवीनं तिचे तिरुपती येथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "आणि आता 2024 सुरू झाल्यासारखे वाटते. गोविंदा गोविंदा!" जान्हवीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






जान्हवीनं करणच्या शोमध्ये घेतलं शिखरचं नाव


'कॉफी विथ करण' या शोमध्ये  करण जोहरनं जान्हवीला प्रश्न विचारला की, 'तुझ्या फोनच्या स्पीड डायल लिस्टमध्ये 3 टॉप कॉन्टॅक्ट कोणाचे आहेत?' या प्रश्नाचं उत्तर देताना जान्हवी म्हणते, पप्पा, खुशू आणि शिखू (शिखर पहाडिया). जान्हवीनं शोमध्ये हे देखील सांगितलं की, शिखर हा तिच्यासाठी नादान परिंदे हे गाणं गात होता.


शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर हा स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा मुलगा आहे.   काही दिवसांपूर्वी  जान्हवी कपूर ही सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियासोबत  महाकाल देवाच्या दर्शनासाठी उज्जैनच्या (Ujjain) महाकालेश्वर मंदिरात गेली होती. महाकालेश्वर मंदिरातील जान्हवी आणि शिखर यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Janhvi Kapoor: 'हर हर महादेव'; जान्हवी कपूरनं माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन