मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या 'धडक'चा ट्रेलर आज लॉन्च होणार आहे. इशान खट्टर आणि जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'धडक'चा ट्रेलर आज दुपारी 12 वाजता रिलीज होईल.


'धडक' हा नागराज मंजुळेच्या गाजलेल्या 'सैराट' या मराठी सिनेमाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. त्यामुळे सिनेमाचा ट्रेलर पाहताना प्रत्येक डायलॉगमध्ये सैराटची आठवण आल्याशिवाज राहत नाही. 'सैराट'मध्ये आर्ची-परशाची जोडी होती. तर 'धडक'मध्ये मधुकर आणि पार्थवी अशी मुख्य व्यक्तिरेखांची नावं आहेत. सैराटची कथा सोलापुरात घडते तर धडकमध्ये राजस्थानची पार्श्वभूमी आहे.

'सैराट'च्या गाण्यांची हवा हिंदीत, 'धडक'मध्येही 'झिंगाट'

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.

'धडक' चित्रपट 20 जुलै 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 21 वर्षांच्या जान्हवीचा डेब्यू आहे. 22 वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाऊड्स'मध्ये झळकला होता. तर 'उडता पंजाब'मध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.

लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. तर अनेक पुरस्कारही खिशात घातले होते. त्यामुळे हिंदी रिमेक असलेला धडक बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे प्रदर्शनानंतरच कळेल.

संबंधित बातम्या

करण जोहरच्या 'धडक'चं नवं पोस्टर, रीलिज डेटही बदलली

‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात, पहिल्या शॉटचे फोटो समोर

'सैराट'च्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच, सिनेमाचं नाव...

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबत श्रीदेवीही झळकणार?

पाहा ट्रेलर