Janhvi Kapoor Role in Peddi: 'पेद्दी' (Peddi) सिनेमा (Movie Release) रिलीज झाल्यापासून जान्हवी कपूरची (Janhavi Kapoor) प्रचंड चर्चा होत आहे. राम चरण अभिनीत या सिनेमात जान्हवी कपूरचा अतिशय बोल्ड अंदाज दाखवण्यात आला आहे. सोशल मीडिया वापरकर्ते सध्या दिग्दर्शक बुची बाबू सना आणि 'पेद्दी' सिनेमाच्या मेकर्सवर टीका करत आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूरचा वापर केवळ 'प्रॉप' (शोभेची वस्तू) म्हणून केली आहे, अशी टीका केली जात आहे. एकीकडे युझर्सकडून टीका सुरू असताना, गायिका सुमंगली अरियानायगम यांनीही टीका केली आहे. या चित्रपटात अभिनेत्रीला केवळ साधन बनून ठेवण्यात आलं आहे, असं सिंगर म्हणाले.
सिंगरकडून 'पेद्दी'च्या फिल्ममेकर्सवर टीका (Janhvi Kapoors character in Peddi being criticized)
जान्हवी कपूरवरुन सुरू असलेला वाद अद्याप काही क्षमलेला नाही. यावर सिंगर सुमंगली यांनीही टीका केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करुन फिल्मच्या टीमवर जोरदार हल्ला चढवला. गायिका सुमंगली यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुमंगली यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'एका शक्तिशाली पुरुषांनी भरलेल्या खोलीत बसून, असुरक्षिततेच्या वेदनेवर ही कथा लिहिली गेली. पण जान्हवी कपूरच्या पात्राला फक्त कॅमेऱ्यासाठी एक शरीर, जबरदस्ती चुंबनासाठी एक साधन आणि गाणं संपल्यानंतर फेकून देण्याचं एक उपकरण बनवून टाकलं आहे'.
'फिल्म निर्मात्यांना मानवी प्रतिष्ठा आणि आदर नेमका काय असतो, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. पण त्यांनी जान्हवी त्यास पात्र नाही असे ठरवले', असं सिंगर सुमंगली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. सध्या सुमंगली यांची स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, जान्हवी कपूरने 'पेद्दी' या सिनेमात 'अचियम्मा' नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक तसेच समीक्षकांचा असा आरोप आहे की, जान्हवीच्या अभिनयावर किंवा कलेवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी, कॅमेरा अनेकदा तिच्या छाती, कंबर आणि संपूर्ण फिगरवर केंद्रीत होता. या सिनेमातील बरेच शॉट्स 'ऑब्जेक्टिफाय' केलेले दिसतात. एका सीनमध्ये 'पेद्दी' सिनेमातील राम चरणचं पात्र तिच्याशी गैरवर्तन करतो, तेव्हा देखील मर्यादा ओलांडली जाते. या सर्व टीकेदरम्यान, गायिका सुमंगली यांची इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
