जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल भाजपमध्ये?
एबीपी माझा वेब टीम | 10 Jan 2017 01:38 PM (IST)
मुंबई: अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये दोघेही भाजपचा प्रचार करणार असल्याचं समजतंय. थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात पोहोचून भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर यासंदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. या यादीत आता अभिनेत्यांचाही समावेश होण्याची चिन्हं आहेत.